QR Code Fraud case आजच्या डिजिटल युगात पैसे ट्रान्सफर करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून क्यूआर कोडचा पर्याय समोर आला आहे. आपण भाजी खरेदीसाठी असो किंवा कपडे खरेदी करण्यासाठी, प्रत्येक छोट्या पेमेंटसाठी क्यूआर कोड वापरतो. गूगल पे, पेटीएम आणि फोनपेसारख्या यूपीआय पेमेंट अॅप्सद्वारे सहज स्कॅन करून पेमेंट केलं जाऊ शकतं.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
हे करणं अतिशय सोपं आहे, क्यूआर कोड स्कॅन करून पिन टाकल्यानंतर लगेच त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात. परंतु, कधीकधी पडताळणीशिवाय क्यूआर कोड स्कॅन करणंदेखील धोकादायक ठरू शकतं. अशातच फसवणुकीचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून हे एकूण प्रकरण पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
तु्म्हीही सगळीकडे QR कोडने पेमेंट करता का? वेळीच सावध व्हा… आम्ही असं का म्हणतोय ते तुम्हाला व्हिडीओ पाहून कळेल. लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडिया घेऊन येत असतात.
कितीही चलाख चोर असू देत पोलिस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. अशातच मध्य प्रदेशच्या छतरपूरमधून चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चोरांकडून चोरी करण्यासाठी चक्क डिजिटल पद्धतीचा अवलंब केला जात आहे. या चोरांनी चक्क दुकानाचे क्यूआर कोड चोरून तेथे आपल्या अकाऊंटचे क्यूआर कोड लावले, ज्यामुळे दुकानदाराचे पैसे अगदी सहज चोराच्या अकाऊंटमध्ये जातात.