व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

⬇️⬇️येथे क्लिक करा ⬇️⬇️

नेमकं काय घडलं?

ही घटना मुंबईतील विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये एका बांधकाम सुरु असलेल्या इमरतीत घडली. कन्नमवार नगर भागात ५७ क्रमांकाच्या इमारतीच बांधकाम सुरू आहे. याच ठिकाणी काम करणारा कामगाराने इमारतीवरून आत्महत्या करण्यास उडी मारली. हा कामगार १३ व्या मजल्यावरून उडी मारूनही तीन वेळा सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यांमद्ये अडकून ही सुरक्षित राहीला. बिरजूप्रसाद रमेश बनरवा असे या कामगाराचे नाव असून तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. काल तो काम करीत असलेल्या ५७ क्रमांकाच्या इमारतीच्या तेराव्या मजल्यावर गेला तिथून त्याने खाली उडी मारली. परंतु तो आठव्या मजल्यावर लावण्यात आलेल्या जाळीत अडकला. तिथून ही त्याने उडी मारली तर तिसऱ्या मजल्यावरील जळीत अडकला तिथूनही उडी मारल्यावर खाली लोकांनी पकडलेल्या जाळीत पडला आणि त्याचा जीव वाचवला